एअर इंडिया कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली
नियमाचे पालन न केल्याबद्दल हवाई वाहतूक संचालनालयाने एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियाला 3 नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीनुसार एअर इंडियाने प्रवाशांना पुरवलेल्या जाणाऱ्या सुविधांशी संबंधित नियमांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल उत्तर मागितले होते.
हवाई वाहतूक संचालनालयाने बुधवारी म्हटले की, एअर इंडियाने कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे असे आढळून आले की, एअर इंडियाने सीएआरच्या तरतुदींचे पालन केले नाही. या नोटिशीनुसार विमानाला उड्डाण करण्यास उशीर झाल्यानंतर प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था एअर इंडियाने केली नाही. काही ग्राउंड कर्मचाऱ्यांना अटींनुसार प्रशिक्षण न देणे आणि बिजनेस क्लासच्याल प्रवाशांना भरपाई न देणे, यासर्व धिसाळ कारभारासाठी एअर इंडियाला10 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top