एलन मस्कसाठी भारताने गुंतवणूक नियम शिथिल केले

नवी दिल्ली – अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती, टेस्ला,स्पेसएक्स कंपनीचे संस्थापक एलन मस्क येत्या २१ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोदी सरकारने जय्यत तयारी केली असून मस्क यांच्यासाठी अवकाश संशोधन क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक ७४ ट्क्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेऊन मस्क यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत .
१६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.त्यानुसार अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रासंबंधीच्या नियमात बदल करण्यात आला आहे.उपग्रहांची निर्मिती, प्रक्षेपण या क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी अधिक उदार धोरण तयार करण्यात आले आहे. उपग्रहांची निर्मिती, त्यांचे प्रक्षेपण आणि त्या अनुषंगाने लागणारी सर्व यंत्र, सुटया भागांची निर्मिती अशा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला खुले निमंत्रण मिळाले आहे.
सुधारित कायद्यामध्ये उपग्रहांची निर्मिती, प्रक्षेपण, प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले तळ या संपूर्ण क्षेत्रात ऑटोमेटीक रूटच्या मार्गाने ७४ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top