केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन

मुंबई :

केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरी शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या. राजेश्वरी या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वी त्रास वाढल्याने त्यांना अहमदाबादहून मुंबईला हलवण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोठी बहीण राजेश्वरी शाह यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अमित शाह कार्यकर्त्यांसोबत मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी रविवारपासून अहमदाबादमध्येच होते. आज ते बनासकांठा आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. त्यांच्या हस्ते बनासकांठामधील देवदार गावात बनास डेअरीचे उद्घाटन होणार होते. त्यानंतर दे दुपारी गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. मात्र राजेश्वरी शाह यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. राजेश्वरी शाह यांचे पार्थिव आज त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील अनेक नेत्यांनी राजेश्वरी शाह यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top