कोपनहेगनमधील १७ व्या शतकातील इमारतीला आग

कोपनहेगन

डेन्मार्कच्या कोपनहेगनमधील ऐतिहासिक बोर्सन स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीला भीषण आग लागली. ही इमारत १७ व्या शतकातील आहे. ही इमारत एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. आगीमुळे इमारतीचा लँडमार्क शिखर जळला आणि जमिनीवर तुटून पडला. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आगीमुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आग लागली तेव्हा इमारतीचे नुतनीकरण सुरु होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले होते. मात्र या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top