कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा

कोल्हापूर –

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चार गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ या चार महिलांची सोनोग्राफी करून गर्भाला धोका नसल्याची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात इचलकरंजीमध्ये झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता शहरात या व्हायरसने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला . आतापर्यंत जिल्ह्यात आठ झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका व्हायरस तपासणीसाठी तत्काळ ४५७ गर्भवती महिलांचे नमुने घेतले. यातील चार महिलांचे झिका व्हायरसचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोके दुखी, डोळे लाल होणे ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत. मात्र, यापैकी एकही लक्षण या गर्भवती महिलांमध्ये नाही. झिका व्हायरस आढळलेल्यांमध्ये विचारेमाळ, कदमवाडी, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी राजारामपुरी येथील प्रत्येकी १ गर्भवती महिलेला समावेश आहे. २० ते ३५ वयोगटातील या महिला आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top