खेड तालुक्यात भाताच्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन !

पुणे- खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीमध्ये देशांतील नामशेष होत चाललेल्या भाताच्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन केले जात आहे.सध्या देशभरात केवळ १५० ते २०० भाताची वाण शिल्लक आहेत.

सह्याद्री स्कूल हे देशी बियाणे संवर्धक व समन्वयक दिपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक शेती करत आहे.तब्बल ६५ एकर परिसरात या शाळेची शेती आहे.याठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना पौष्टिक, शुद्ध व विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग केले जातात.आपण सहसा कधीही ज्यांची नावे ऐकलेली नाहीत अशा भाताचे प्रकार या सह्याद्री शाळेच्या नैसर्गिक शेतीत पाहायला मिळतात.त्यामध्ये साईभोग,तुळश्या,नांदेड हिरा,जीर – खरपूड,चकावह आणि नवारा ब्लॅक आदी भात वाणांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top