गुनामध्ये डंपरला धडक दिल्याने बसला भीषण आग

13 जणांचा होरपळून मृत्यू
भोपाळ
मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात काल रात्री डंपरला धडक दिल्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला,तर 17 प्रवासी जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
गुना-आरोन मार्गावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन आग लागली. या घटनेच्या वेळी बसमध्ये 30 प्रवासी होते आणि त्यापैकी 4 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला.17 जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top