गोव्याच्या डिचोली तालुक्यात भरदिवसा बिबट्याची दहशत

मडगाव – उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोली तालुक्याच्या अनेक भागात बिबट्यांचे भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडू लागल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासुन अवचितवाडा भागात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या बिबट्याने परिसरातील अनेक भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.भरदिवसा रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाल्याचे या भागातील काहींनी सागितले.त्यामुळे आता याठिकाणी चार दिवसांपूर्वी वनविभागाने पिंजरा लावला असून रात्रीच्या वेळी त्यात एक कुत्राही बिबट्याला भक्ष्य म्हणून सुरक्षित कप्यात ठेवला आहे.कुत्रे ठेवल्यामुळे शिकारीसाठी बिबट्या येईल व पिंजऱ्यात जेरबंद होईल, असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.काही दिवसापूर्वी धबधबा येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता.तसेच पाजवडा येथील स्मशानभूमीजवळ सर्रास बिबट्याचे दर्शन घडत असून त्या भागातील काही कुत्री बिबट्याने फस्त केल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top