गोव्यातील ‘संजीवनी’चे आंदोलन आता पणजीतील आझाद मैदानात

पणजी – गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना असलेला संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करून इथेनॉल युनिट सुरू करण्याच्या मागणीसाठी ऊसउत्पादक
शेतकर्‍यांनी पाच दिवसांपासुन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दिशा बदलली असून आता शेतकऱ्यांनी पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.उद्या सोमवार ८ जानेवारीपासून पणजीतील आझाद मैदानावर हे शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत.
बंद पडलेल्या या साखर कारखान्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी इनेथॉल प्लांट सुरू करण्याची मागणी केली आहे.मात्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत नाही, असा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी २ जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.आता या
शेतकऱ्यांनी ८ जानेवारीपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.राजधानी पणजीत आझाद मैदानावर होणार्‍या धरणे आंदोलनात २५० ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री आमची दाखल घेत नाहीत,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सांगे भागात या ऊसउत्पादक संघटनेविरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या व्यक्तींच्या घरासमोरसुद्धा लवकरच धडक मारण्याचा निर्धार संतप्त आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top