गोव्यात पहिल्यांदा महिला उमेदवार लढणार

पणजी – भाजपाने उत्तर गोव्यातून श्रीपाद येसो नाईक यांना उमेदवारी दिली आहे तर दक्षिण गोव्यातून पहिल्यांदाच डेम्पो इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक पल्लवी डेम्पो या पहिल्या महिला उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप उत्तर गोव्यातून निवडणूक लढवणार आहेत, तर काँग्रेस नेते कॅप्टन विरिएटो फर्नांडिस दक्षिण गोव्यातून निवडणूक लढवणार आहेत. गोव्यातील काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस्को सार्डिन्हा यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top