जगभरातील १६० देशांत रामोत्सव साजरा होणार

अयोध्या :

अयोध्येतील राम मंदिरातील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिकेसह जगातील १६० देशांमध्ये या सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्येतील सोहळ्यामुळे भारतासह जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम स्क्वेअर याठिकाणी अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कॅलिफोर्निया, शिकागो, वॉशिंग्टन येथे मोटारगाड्यांची रॅली काढण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरमध्ये या सोहळ्याचे डिजिटल प्रसारण करण्यात आले होते. फ्रान्समधील आयफेल टॉवर या ऐतिहासिक स्थळावरही हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. फ्रान्समधील पॅरिस येथे २१ जानेवारी रोजी रामरथ यात्रा काढण्यात येणार आहे. कॅनडातील मंदिरात पूजा-अर्चा आणि दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कॅनडा, जर्मनी, फिजी या देशांसह इंडोनेशिया, सौदी अरेबिया आदी देशांतील प्रतिनिधींनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विदेशातील देशांमध्ये शोभायात्रा, पूजा-अर्चा, हनुमान चालिसा पठण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top