जय श्रीराम म्हणा टॅक्सी चालकाची अट!

मुंबई – अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणापासून देशातील हिंदु श्रध्दाळुंमध्ये रामभक्तीची कशी लाट आली आहे याचा काहीसा धक्कादायक अनुभव मुंबईतील एका डॉक्टरला आला. नाशिकला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सीचे ऑनलाईल बुकिंग केले होते. मात्र जेव्हा त्यांनी संबंधित टॅक्सी ड्राव्हरला फोन केला तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्या टॅक्सी चालकाने बुकींग कन्फर्म करण्यासाठी त्यांच्यासमोर जय श्रीराम असे म्हणावे लागेल अशी अट ठेवली.
ए. के. पठाण असे या डॉक्टरांचे नाव आहे. त्यांना आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी नाशिकला जायचे होते. त्यासाठी त्यांनी इनड्राईव्ह या टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या अॅपवरून टॅक्सी बुक केली. त्यानंतर मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या नंबरवर त्यांनी हाजीअली येथून फोन केला आणि टॅक्सी चालकाला हाजीअली येथे येण्यास सांगितले.मात्र तो टॅक्सीचालक त्यांना म्हणाला की, तो रामभक्त आहे आणि जर तुम्ही जय श्रीराम असे म्हटले तरच तो बुकिंग कन्फर्म करेल.
त्याचे म्हणणे ऐकून डॉ. पठाण यांना खरेतर राग आला. परंतु त्यांचा जय श्रीराम म्हणण्यास विरोध नव्हता. मात्र अशाप्रकारची बळजबरी त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी टॅक्सी बुकिंगच रद्द केली. डॉ.पठाण यांनी आपल्याला आलेला हा कटु अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top