जात प्रमाणपत्रास विलंब झाल्याने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्याला ‘सर्वोच्च ‘दिलासा

मुंबई – सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करू न शकल्याने एका विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नव्हता.परंतु सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्याला दिलासा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस.बोपन्ना आणि न्यायमूर्ती पमिदिघंतम श्री नरसिंह यांच्या खंडपीठाने या विद्यार्थ्याला प्रवेश न देण्याच्या जे.जे.स्कूलच्या अधिष्ठात्यांच्या निर्णयाला योग्य ठरविणार्‍या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. यावेळी हा प्रवेश न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल,असेही खंडपीठाने म्हटले केले.

संगप्पा चौधरी नावाच्या या विद्यार्थ्याचा प्रवेश जात प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने सर जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठात्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाविरोधात चौधरी याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.जात पडताळणी समितीच्या विलंबामुळे आपण प्रवेश घेताना प्रमाणपत्र सादर करू शकलो नाही,तरी महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी विनंती चौधरी याने न्यायालयाकडे केली. मात्र उच्च न्यायालयाने अधिष्ठाता यांचाच निर्णय योग्य ठरवत चौधरीची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर चौधरीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती बोपण्णा आणि न्यायमूर्ती श्री नरसिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत चौधरी याला पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश आदेश जे.जे. स्कूलच्या अधिष्ठातांना दिले आणि प्रतिवादींना नोटीस जारी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top