जाहीर संभांना परवानगी द्यावी इम्रान खानच्या पक्षाची याचिका

कराची
पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने इस्लामाबाद हायकोर्टात चार याचिका दाखल केल्या असून ज्यात निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर रॅली आणि राजकीय ाहीर सभा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. अदियाला तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत बैठका घेण्याची सोय करण्याची मागणीदेखील याचिकांतून केली आहे.
याआधी इस्लामाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. इम्रान खान यांनी तुरुंगात पक्षाचे सदस्य असद कैसर आणि जुनैद अकबर खान, सिनेटर औरंगजेब खान आणि मित्र मोहम्मद खान आणि इश्तियाक मेहरबान यांना भेटण्याची परवानगी मागितली आहे. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पक्षातील नेत्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे या याचिकांत म्हणाले आहे. दरम्यान, विशेष न्यायालयाने खान यांना बायोमेट्रिक पडताळणीचा वापर करून दोन बँक खाती उघडण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधीश अबुल हसनत झुल्करनैन यांनी बँक कर्मचाऱ्यांना इम्रान खान यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्याचे आदेश अदियाला तुरुंगाच्या अधीक्षकांना दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top