जेट एअरवेजचे नरेश गोयलना कोणी ओळखलेच नाही

मुंबई
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.गडगंज संपत्ती कमावेला हा उद्योजक गजाआड झाल्यानंतर त्याचा पुरता आवेशच गेला आहे . गोयल यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांना आपल्या पत्नीची भेट घेण्यासाठी काही तासांसाठी तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले होते. गोयल हे तुरुंगाबाहेर पडताच प्रसिध्दी माध्यमांच्या छायाचित्रकारांनी त्यांचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाले. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्या प्रतिक्रियांचा रोख हेच का ते नरेश गोयल असा होता. म्हणजे सफेद केस, सफेद खुरटी दाढी आणि पांढरा झब्ब-लेंगा अशा अवतारात गोयल यांनी कोणी ओळखलेच नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top