टाटा कंपनी आणि महावितरणबदलापुरात वीजप्रकल्प उभारणार

मुंबई- महाराष्ट्र राज्य सरकारची विद्युत वितरण कंपनी असलेली महावितरण आणि खासगी टाटा कंपनी यांच्या सहकार्याने बदलापुरात चार एकर जागेत नवा वीजप्रकल्प उभारला जाणार आहे.या प्रकल्पातून ४०० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती केली जाणार असून यामुळे बदलापुरकरांची भारनियमनातून सुटका होण्याची शक्यता आहे.
मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी काल सोमवारी कुळगाव -बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे तसेच टाटा कंपनीच्या अधिकार्‍यांसह या वीज प्रकल्पासाठी लागणार्‍या जागेची पाहणी केली.बदलापुरच्या मोहपाडा येथे ही जागा उपलब्ध आहे. टाटा कंपनी याठिकाणी वीजनिर्मिती करून ही वीज थेट ग्राहकांना न देता महावितरणला देणार आहे. महावितरणमार्फतच बदलापुरकरांना येथून वीजपुरवठा केला जाणार आहे.सुरुवातीला १०० केव्ही आणि नंतर ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना वीजबिलेही महावितरणकडूनच दिली जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top