ठाणे पूर्व उड्डाणपूलाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार!

*नवे पालिका आयुक्त
सौरभ राव यांचा निर्धार

ठाणे- गेल्या महिन्यात ठाणे पालिका आयुक्तपदी नव्याने रुजू झालेल्या सौरभ राव यांनी नुकतीच ठाणे पूर्व उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.यावेळी त्यांनी हे उड्डाणपुलाचे काम यावर्षीच्या १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेंतर्गत या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.स्मार्ट सीटीचा हा प्रकल्प असून या उड्डाणपुलाचा एकूण २.१३ किमी अंतराचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम आणि कोपरी येथील रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून ते युद्धपातळीवर सुरू आहे.यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी या कामाचे आरेखन समजून घेतले. तसेच स्टेशन परिसरातील बांधकाम स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला.यावेळी त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top