डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकर बोचर्‍या थंडीने गारठणार !

मुंबई- मागील काही दिवसांपासून मुंबईतील रात्रीच्या तापमानात घट झाली आहे.त्यामुळे थंडीचा मोसम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.मात्र पुढील महिन्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बोचरी थंडी पडून मुंबईकर गारठणार आहे,असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान खात्याने सांगितले की,सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे तापमान शुष्क झाले आहे.मुंबईतील किमान तापमान २३ तर कमाल तापमान ३५ अंश राहण्याची शक्यता आहे.काल रविवारी मुंबईतील कमाल तापमान कुलाबा ३१.८ तर सांताक्रूझ ३३.९ इतके तर किमान तापमान कुलाबा २४ आणि सांताक्रूझ २१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी म्हटले आहे की, काश्मीरमध्ये बर्फ पडला की त्याचा थंडावा उत्तर-दक्षिण भारतात होतो.ही परिस्थिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण होणार असल्याने मुंबईत त्याकाळात कडाक्याची थंडी जाणवणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top