तमाशाचा फड उभारताना शॉक लागून दोघांचा मृत्यू

बुलढाणा – यात्रेमध्ये तमाशाचा फड उभारताना अचानक विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात काल घडली. अंकुश भारूडे आणि विशाल भोसले अशी मृतांची नावे आहेत.दोघेही ३० ते ४० वयोगटातील आहेत.

पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यात्रेत जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कलावंत तमाशाचा फड उभारत होते. त्यावेळी एकाच्या हातातील लोखंडी पाईपचा विद्युत तारेशी संपर्क झाला.यामध्ये शॉक लागून अंकुश भारूडे आणि विशाल भोसले यांचा जागीच मृत्यू झाला,तर राहुल जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.मृत अंकुश भारूडे हा पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रहिवासी आहे,तर विशाल भोसले हा जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील राहणारा आहे. जखमी राहुल जाधव हा नवी मुंबईतील घणसोली येथील मूळ रहिवासी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top