तमिळ सुपरस्टार थलपती विजय नवा राजकीय पक्ष काढणार

चेन्नई – दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने तामिळनाडूत आपला नवा राजकीय पक्ष काढण्याची
तयारी सुरु केली आहे. विजयची या नव्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवडही करण्यात आली आहे. पक्षाच्या एका सदस्यानेच सांगितले की,आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

या नव्या पक्ष नोंदणीसंदर्भात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत २०० सदस्यांनी हजेरी लावली होती.यावेळी पक्षाचे सरचिटणीस आणि खजिनदार यांचीही नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय कार्यकारिणीही स्थापन करण्यात आली आहे.या परिषदेने विजयला पक्षाचे नाव आणि नोंदणीबाबत निर्णय घेण्याचे आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे अधिकार दिले आहेत.२०२६ मध्ये तामिळनाडूमधील निवडणुकांपूर्वी विजय प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करणार आहे.तमिळ चित्रपटात रजनीकांत यांच्यानंतर विजयकडे पाहिले जाते.त्याने ६८ चित्रपटांमध्ये काम केले आहे.गेल्या अनेक दशकांपासून त्याची राजकारणात उतरण्याची इच्छा आहे.

तो काही वर्षांपासून मोफत अन्न वाटप, शैक्षणिक शिष्यवृत्ती, ग्रंथालय, संध्याकाळची शिकवणी आणि अगदी कायदेशीर मदत यासह अनेक धर्मादाय आणि कल्याणकारी उपक्रम राबवित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top