तरुणाची विहिरीतउडी मारून आत्महत्या

पुणे – पुण्यातील बाणेर येथे कळमकर चौका जवळील विहिरीत स्वप्निल राऊत या तरुणाने उडी मारून आपले जीवन संपवले. मानसिक आजार व घरगुती वादातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२:३०च्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ सोसायटीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वप्नील मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा होता. तो हिंजवडीमधील एका छोट्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याचे वडील, भाऊ शेजारी सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तो घरातले सगळे झोपल्यावर विहिरीवर गेला आणि पाण्यात उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी विहिरी शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिले असता, त्याने विहिरीत उडी मारल्याचे उघडकीस आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top