तुळजाभवानीचे दागिने वितळण्यास स्थगिती

सोलापूर- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला उच्च न्यायालयाने स्थागिती दिली आहे. तुळजाभवानीच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली होती. यात २००९ ते २०२२ या काळात भाविकांनी अर्पण केलेल्या २०७ किलो सोने व २,५७० किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता मात्र, याला काही भाविक आणि पुजाऱ्यांचा विरोध होता. हिंदू जनजागरण समितीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या दोन न्यायायाधीशांच्या खंडपीठने पुढील सुनावणीपर्यंत दागिने वितळवण्यास स्थगिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top