अर्जेटिनामधील सौंदर्यस्पर्धेत ६० वर्षीय महिला विजयी

ब्युनॉस आयर्स
अर्जेटिनामधील ब्युनॉस आयर्स शहरामधील एका सौंदर्यस्पर्धेत अलेझांड्रा मारिसा रॉड्रिग्ज या ६० वर्षीय महिलेने विजयी होऊन सर्वांना चकीत केले. १८ ते ७३ वर्ष वयोगटातील ३४ महिलांमधून त्यांनी या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्या पेशाने वकिल व पत्रकार आहेत. त्यांनी पूर्वी न्युयॉर्क पोस्ट मध्ये बातमीदारी केली आहे. त्यानंतर कायद्याची पदवी घेऊन सध्या त्या एका रुग्णालयात कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करत आहेत.

बुधवारी झालेल्या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील विजयानंतर आता त्या मे २०२४ मध्ये होणाऱ्या मिस अर्जेंटिना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. मिस अर्जेंटिना स्पर्धेत विजयी झाल्यास त्या मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिवर्स स्पर्धेत अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करतील. मिस युनिव्हर्स स्पर्धेत यापूर्वी १८ ते २८ वयापर्यंतच्या महिलांनाच सहभागी होता येत असे. २०२३ पासून या स्पर्धेतील कमाल वयोमर्यादा हटवण्यात आल्यामुळे आता १८ वर्षावरील कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल अलेझांड्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top