दादरमध्ये कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग

१७ ते १८ गाड्या जळून खाक

मुंबई

मुंबईच्या दादर पश्चिमेला असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोठी आग लागली. ही आग काल मध्यरात्री १ चा सुमारास पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी १ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पार्किंगमधील १६ ते १७ गाड्या आगीत जळून खाक झाल्या. कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन करून गाड्यांची पार्किंग केली जाते त्यामुळे ही आग लागली, असा स्थानिकांचा आरोप आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असून, याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top