देशात ७१८ हिम बिबटे

नवी दिल्ली : भारतात आढळणाऱ्या ‘हिम बिबट्यां’चा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्य:स्थितीत या प्रजातीचे ७१८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील निम्म्यापेक्षा जास्त, ४७७ हिम बिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत.

‘स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम’(एसपीएआय) हा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केला. या अहवालानुसार भारतात ७१८ हिम बिबटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top