नववर्षी ‘म्हाडा ‘ मध्ये दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी लोकशाही दिन

मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने येत्या नवीन वर्षापासून नवीन संकल्प केला आहे.पुढील वर्षातील प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ११ वाजता म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, असे म्हाडाने जाहीर केले आहे.

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तसेच अडचणी याबाबत न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो. त्याच धर्तीवर ‘म्हाडा’मध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा दिन आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल, म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे प्रपत्र १ अ ते प्रपत्र ड हे नमुने म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top