नायगारा धबधब्याजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

न्यूयॉर्क

न्यूयॉर्कच्या नायगारा धबधब्याजवळ अमेरिका आणि कॅनडाला जोडणाऱ्या रेनबो ब्रिजवर भरधाव वेगात असणारी गाडी टोल बूथवर धडकून भीषण स्फोट झाला. या अपघातात गाडीमधील दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सीमेवर उपस्थित असलेला एक सुरक्षारक्षकही जखमी झाला. नायगारा धबधब्याच्या महापौर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी अमेरिकेहून कॅनडाला जात होती. या घटनेनंतर नायगारा धबधबा येथील दोन्ही देशांना जोडणारे चारही पूल बंद करण्यात आले होते. न्यूयॉर्क ते कॅनडाला जोडणारा रेल्वे मार्गही तात्पुरता बंद करण्यात आला होता.

रेनबो ब्रिज व्यतिरिक्त यामध्ये लुईस्टन, व्हर्लपूल आणि पीस ब्रिजही बंद करण्यात आले होते. नंतर रेनबो ब्रिज वगळता सर्व खुले करण्यात आले. या भीषण स्फोटानंतर हा दहशवादी हल्ला असल्याचा दावा काही अमेरिकन प्रसार माध्यमांकडून केला जात होता. यानंतर न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी यांनी स्पष्ट केले की, ‘पुलावरील अपघातात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याच्या खुणा नाहीत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) तपास करत असले तरी हा फक्त एक अपघात आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top