नासाची आर्टिमिस मोहिम लांबणीवर

वॉशिंग्टन ः अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‌’नासा‌’ने आपली महत्वाकांक्षी ‌‘आर्टेमिस‌’ ही मानवाला चंद्रावर पाठविण्याची मोहिम सन 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे.या मोहिमेच्या माध्यमात्ूान नासा पहिल्यांदाच महिला अंतराळवीर चंद्रावर उतरविणार आहे.
नासाने आता आर्टेमिस-2 या चांद्रमोहिमेसाठी सप्टेंबर 2025 चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. चंद्राच्या जवळ जाणारी ही पहिली मानवयुक्त मोहिम असेल. मात्र या मोहिमेमध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरविण्याची योजना नाही. त्यानंतर आर्टेमिस-3 या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच अंतराळवीर उतरविण्याचा प्रयत्न नासा करणार आहे. या आर्टेमिस-3 मध्ये एक महिला आणि एका कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश असेल.
चंद्राच्या भूमीवर अवकाश स्थानक वसविण्याचा प्रयत्न नासा आपल्या आर्टेमिस-4 या मोहिमेद्वारे करणार आहे. ही मोहिम सन 2028 मध्ये प्रत्यक्षात येणे अपेक्षित आहे. आर्टेमिस मालिकेतील आर्टेमिस-2 ही पहिली चांद्रमोहिम यावर्षी हाती घेण्यात येणार आहे.नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ही माहिती दिली आहे.
आर्टेमिस-2 या मोहिमेत ओरियन हे यान अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेप घेणार आहे.या मोहिमेद्वारे अवकाशातील कठीण हवामानावर नियंत्रण मिळविणे आणि अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठीच्या लाईफ सपोर्ट यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे,असेही नेल्सन यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top