‘न्यूजक्लिक ‘चे अमित चक्रवर्ती माफीचा साक्षीदार होण्यास तयार

नवी दिल्ली- ‘न्यूजक्लिक ‘या वृत्त संकेतस्थळाचे एचआर म्हणजे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. या वृत्तसंस्थेवर पैसे मिळविण्यासाठी चीनच्या समर्थनार्थ भारताचा दुष्प्रचार केल्याचा करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांच्यावर यूएपीए अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्रवर्ती यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी माफी मिळावी आणि माझ्याकडे यासंबंधी महत्त्वाची माहिती असून ती मी दिल्ली पोलिसांना सांगण्यास तयार आहे,असे चक्रवर्ती अर्जामध्ये म्हणाले आहेत.कोर्टाने दंडाधिकारी न्यायालयाला चक्रवर्ती यांची साक्ष नोंदवण्याच्या सुचना दिल्या आहेत.१ ऑक्टोंबर रोजी दिल्ली पोलिसांनी चक्रवर्ती आणि प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरावर छापे मारले होते. याप्रकरणी कोर्टाने दोन आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.न्यूजक्लिकला कोणाकडून निधी मिळाला याबाबत सक्तवसुली संचालनालयाने तपास केला होता.केंद्रीय यंत्रणाच्या इनपुटनुसार दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता.
ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स वर्तामापत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यामध्ये न्यूजक्लिकला अमेरिकन अब्जाधीश नेविल्ले रॉय सिंघम यांच्याकडून ३८ कोटी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. सिंघम यांचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रपोगंडा कंपनीसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे. ईडीच्या तक्रारीनुसार भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवण्यासाठी न्यूजक्लिकला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top