पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आंध्र आणि केरळच्या दौऱ्यावर

अमरावती :

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ जानेवारी रोजी आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोदी विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

१६ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पलासमुद्रम येथे पोहोचतील आणि नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स ( एनएसीआयएन) च्या नवीन संकुलाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान भारतीय महसूल सेवेच्या (सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर) ७४ व्या आणि ७५ व्या तुकडीचे अधिकारी प्रशिक्षणार्थी तसेच भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसच्या अधिकारी प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधतील.

१७ जानेवारी रोजी सकाळी ०७.३० वाजता पंतप्रधान केरळमधील गुरुवायूर मंदिरात पूजा अर्चना आणि देव दर्शन करतील. सकाळी १०:३० वाजता ते त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात पूजा आणि देवदर्शनही करतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता पंतप्रधान बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

कोची दौऱ्यात पंतप्रधान ४हजार कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) मधील न्यू ड्राय डॉक (एनडीडी), कोचीन शिपयार्ड लिमिटेडची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा (आयएसआरएफ) आणि कोची येथील पुथुव्‍यपीन येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपनीच्या ​​एलपीजी आयात टर्मिनल या प्रकल्पांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top