पणजीत १० फेब्रुवारीपासून वार्षिक कार्निव्हल महोत्सव

पणजी- गोव्यातील संस्कृतीचा एक भाग असलेला गोवा कार्निव्हल महोत्सव १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पणजी शहरात आयोजित करण्‍यात आला आहे.ही वार्षिक कार्निव्हल मिरवणूक शहरातील बांदोडकर मार्गावरून १० फेब्रुवारी रोजी काढली जाणार आहे.
तसेच यंदा या कार्निव्हलसाठी सलग ५८ वर्षे योगदान देणारे फ्रांकित मार्टिन्‍स यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती पणजी कार्निव्हल समितीचे अध्‍यक्ष व महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मोन्‍सेरात बोलत होते. यावेळी आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक बेंटो लॉरेन्‍स, समिती सचिव विवेक पार्सेकर आदी उपस्थित होते.यावेळी मोन्सेरात म्हणाले,या तीन दिवसांच्या सांगीतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या ‘सांबा स्क्वेअर’ची उभारणी गार्सिया उद्यानाजवळील रस्त्यावर केली जाणार आहे.तेथे नील रिबेरो यांचाही कार्यक्रम होईल.या सांबा स्क्वेअरमध्ये जाण्यासाठी शुल्क आकारले जाते.शिवाय तेथील स्टॉल्‍सना दिवसाप्रमाणे महापालिका भाडे आकारते. त्यातून चांगला महसूल प्राप्त होत असतो.मिरवणूक दुपारी ३ वाजता सुरू होईल.११ फेब्रुवारी रोजी ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय बँड क्वीनचा कार्यक्रम हे या कार्निव्हलचे.मुख्य आकर्षण ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top