पाटणच्या हेळवाक आरोग्य केंद्रात सुविधांचा बोजवारा

पाटण – तालुक्यातील कोयना विभागात असलेल्या हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.अपुरा कर्मचारी वर्ग आणि औषधांचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

हेळवाक प्राथमिक आरोग्य
केंद्रांतर्गत ६० गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण विभाग व्याघ्र प्रकल्पाने व्यापलेला आहे. कोयनेच्या चारही बाजूंनी घनदाट झाडी आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांचे हल्ले ही नित्याचीच बाब बनली आहे. या हल्ल्यात जखमी होणार्‍या शेकडो लोकांची या रूग्णालयात सुविधा नसल्याने हेळसांड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हेळवाकचे सरपंच गजानन कदम यांनी माजी सभापती राजाभाऊ शेलार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली.यावेळी रुग्णालयासाठी १०८ नंबरची रुग्णवाहिका येत्या आठ दिवसांत उपलब्ध केली जाईल,पुरेसा औषधांचा पुरवठा करून त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक केली जाईल असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top