पाणी व वीज पुरवठ्याचे बिल थकीतअजिंठा लेण्यांचा पाणीपुरवठा बंद‎

छत्रपती संभाजीनगर :

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पाणी आणि वीज ‎पुरवठ्याचे एका वर्षांचे आठ लाखांचे बील थकले असल्यामुळे पाणीपुरवठ्याची वीज कापल्याने लेण्यांचा ‎पाणीपुरवठा बंद आहे. वीजबिल न भरल्यास महाराष्ट्र जीवन ‎‎प्राधिकरण विभाग पाणीपुरवठा बंद करून ही योजना‎ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात येईल, ‎‎असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिले आहे.‎

पर्यटकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे व मुबलक पाणी ‎‎पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळे‎ १९९८ साली तोंडापूर (ता.जामनेर)येथील फर्दापूर येथे फिल्टर प्लांट उभारून थेट अजिंठा लेण्यांपर्यंत पाणी‎ पोहचवले आहे. महाराष्ट्र जीवन ‎‎प्राधिकरण विभागासोबत ना नफा ना तोटा या तत्त्वावर करार ‎‎करून ही योजना सुरू केली. तेव्हापासून ही योजना महाराष्ट्र ‎‎जीवन प्राधिकरण विभाग चालवत आहेत. फेब्रुवारी २०१९ ‎‎रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बिल थकल्याने पाणीपुरवठा व वीजबिल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ न भरल्याने वीजपुरवठा खंडीत केला होता, तेव्हादेखील ‎सुमारे दोन वर्षे हा पाणीपुरवठा बंदच होता.‎

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पाण्याचे आठ‎ लाख रुपये थकित बिल व देखभाल दुरुस्तीचे ७८ लाख‎६६ हजार रुपये मार्चमध्ये भरले नाही, तर पाणी पुरवठा‎योजना बंद करून महाराष्ट्र पर्यटन विकास‎ महामंडळाच्या ताब्यात देऊ, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता बाबासाहेब सदावर्ते यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top