पिंपरी – चिंचवड शहरातील रेड झोनची मोजणी होणार

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची मोजणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने आणि विविध डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळेगुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ तसेच श्रीम. शेवंताबाई प्राथमिक शाळा क्रमांक 56, वैदु वस्ती या इमारतीची स्थापत्यविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी, प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी, दत्तवाडी, काळभोरनगर व परिसरातील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण व दुरूस्ती करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १९ गावडे कॉलनी, उद्योगनगर, सुदर्शननगर व इतर परिसरामध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास, प्रभाग क्रमांक 3 चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी व इतर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती एम.पी.एम पद्धतीने करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 23 मधील नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तसेच नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top