पियुष गोयलना मुंबईत विरोध भाजपाचे योगेश सागर खवळले

मुंबई – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते प्रचाराला लागले असताना दुसरीकडे भाजपाचेच स्थानिक आमदार योगेश सागर अतिशय नाराज झाले आहेत. योगेश सागर यांना इथे उमेदवारी दिली जाणार होती. मात्र त्यांना मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले योगेश सागर हे प्रचारात सहकार्य करीत नसल्याची चर्चा आहे. यामुळे सागर आता गोयल यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.
भारतीय जनता पार्टीकडे महायुतीतील जागा वाटपात उत्तर मुंबईची जागा आली आहे. या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसला ताकदीचा उमेदवार अजूनही गवसलेला नाही.
पियुष गोयल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या उद्घाटनानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार कार्यात गुंतले आहेत. परंतु योगेश सागर सहकार्य करीत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. या संदर्भात पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना विचारले असता ते म्हणाले की, योगेश सागर यांनी आपल्याशी चर्चा केली. त्यांचा आवाज थोडासा
वाढला होता.
मात्र त्यांची कुठेही अपमानास्पद भाषा अथवा वागणूक नव्हती. आम्ही सामान्यपणे बोलत होतो, असे म्हणून केशव उपाध्ये यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top