पुणे- बंगळूरू हायवेवर बसला आग! प्रवासी सुखरूप

सांगली

पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला भीषण आग लागली. या बसचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. ही घटना आज पहाटेच्या सुमारास तासवडे टोलनाक्याजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र या भीषण आगीत बस जळून खाक झाली.

ही बस कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बसने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. याचदरम्यान अग्निशमदलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरु केले. त्यामुळे तासवडे टोलनाका जवळील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या तळबीड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top