प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी मॉरिशसमध्ये २ तासांची सुटी

मॉरिशस – अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणारा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहाता यावे यासाठी मॉरिशस सरकारने दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. मॉरिशसमधील हिंदूंसाठी राम मंदिराचे उद्घाटन ही महत्वाची घटना असल्यामुळे ही सुटी देण्यात आली आहे. पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मंत्रिमंडळाने शुक्रवारी हा निर्णय घेतला.

अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याचे आकर्षण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. जगाच्या विविध भागात या निमित्ताने विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. अमेरिकेतल्या मंदिरांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तशाच प्रकारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मॉरिशस मधल्या हिंदूधर्मीयांनाही पाहाता यावे यासाठी मॉरिशस सरकारने सोमवारी २२ जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून पुढील दोन तासांसाठी विशेष सुटी दिली आहे. जगभरातचं या सोहळ्याबाबत विविध देशाच्या लोकांमध्येही उत्सुकता असून अमेरिकेतील थायलंडचे राजदूत तानी संगत यांनी राम मंदिराचे उद्घाटन ही अनेक देशांतील लोकांसाठी आनंदाची बाब असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top