बंगालच्या उपसागरात हॅमुन चक्रीवादळ

नागपूर – महाराष्ट्रात थंडी पडायला सुरुवात झाली असतानाच पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या हॅमून चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहे. त्यामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाला हॅमून हे नाव इराणने दिले आहे.
२६ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे वादळ २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झाले असून ते पुढे सरकत आहे. मात्र, भारतीय किनारपट्टीवर त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top