बुर्ज खलिफा नव्हे, आता ‘ही’ जगातील सर्वात उंच इमारत!

रियाध

जगातील सर्वात उंच इमारत अशी दुबईतील बुर्ज खलिफाची ओळख आहे, मात्र ही ओळख आता मागे पडणार असून सौदी अरेबियात तयार होणारे जेद्दाह टॉवर जगातील सर्वात उंच ठरणार आहे. ही नवी इमारत पूर्ण झाल्यानंतर बुर्ज खलिफापेक्षा १७२ मीटर उंच असेल. जेद्दाह टॉवर हा किंगडम टॉवर आणि माईल-हाय टॉवर म्हणूनही ओळखला जातो.

चौदा वर्षांपूर्वी, दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत बनली. तिची उंची ८२८ मीटर होती. या इमारतीने अनेक विक्रम केले आणि ती प्रसिद्ध झाली. बुर्जचे बांधकाम २००४ मध्ये सुरू झाले आणि ते २०१० मध्ये पूर्ण झाले, मात्र आता नवीन इमारती बूर्जचा विक्रम मागे टाकण्याची चर्चा आहे. या नव्या इमारतीची उंची एक किलोमीटर असेल. जेद्दाह टॉवरचे बांधकाम १ एप्रिल २०१३ रोजी सुरू झाले. सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे बुरुज बांधणार्‍या कंपनीचे (जेद्दाह इकॉनॉमिक कंपनी) अध्यक्ष आहेत. हा टॉवर प्रामुख्याने निवासी हॉटेल म्हणून वापरला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top