ब्रिटनमध्ये ‘निपाह’ विषाणूवरील लसीच्या मानवी चाचण्या सुरू

लंडन- ‘निपाह’ हा मुळात वटवाघूळसारख्या प्राण्यात आढळून येणारा विषाणू आहे.या विषाणूंचा माणसांमध्ये होणारा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या लसीच्या मानवी चाचण्यांना ब्रिटनमध्ये सुरुवात झाली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ मंडळींनी या चाचण्यांना सुरुवात केली असून त्यांना त्यात सकारात्मक यश मिळण्याची आशा वाटत आहे.

‘निपाह’ वरील या लसीचे नाव ‘ चॅडॉक्स १ निपाह बी ‘ असे आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पॅनडेमिक सायन्सेस इन्स्टिटय़ूटतर्फे ही लस विकसित केली आहे. या लसीच्या मानवी चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील ५१ जणांनी आपला सहभाग नोंदविला होता.या चाचण्या १८ महिने चालणार आहेत. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष साथ पसरलेल्या देशांमध्ये या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.ही लस बनविण्यासाठी अ‍ॅस्ट्राझेनेक कोविड-१९ लसीसारखे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.’निपाह’ विषाणूचा माणसांमध्ये संसर्ग झाल्यानंतर तीव्र ताप, डोकेदुखी,विसरल्यासारखे होणे,आळसपणा,तंद्री आणि मानसिक गोंधळाची स्थिती आदी लक्षणे दिसून येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top