भरधाव टेम्पोने लहान मुलाला चिरडले! आई गंभीर जखमी

पुणे

पुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोने लहान मुलाला चिरडले. या भीषण अपघातात मुलाची आई गंभीर जखमी झाली. अप्पर उताराच्या रस्त्यावर हा चिमुकला त्याच्या आईसोबत चालला होता. इतक्यात भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. या धडकेमुळे चिमुकला थेट टेम्पोच्या चाकाखाली आला. यात मृत्यू झाला. ही घटना काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास घडली.

रुपाली शिंदे (२८) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रुद्र सचिन शिंदे (४) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला. अक्षय पवार (२४) असे त्याचे नाव आहे. तो वेल्डिंगचे काम करत असून विजय खुरंगुळे यांनी दुरुस्तीसाठी आपला टेम्पो अक्षयला दिला होता. अपघातानंतर पोलीसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. बिबेवाडी पोलीस सध्या अक्षयचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top