मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

पुणे- शिरुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता ही उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. वंचितने काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार वंचितने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र वंचितने घेतलेल्या या निर्णयाला मंगलदास बांदल यांनी विरोध केल्यामुळे त्यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. याबाबत वंचितने त्यांच्या सोशल मीडियवर पोस्ट करत माहिती दिली आहे. दरम्यान बांदल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या बैठकीचे फोटोदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top