मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार गोळीबारात २ ठार! ३ जखमी

इंफाळ

मणिपूरमध्ये काल गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले. इंफाळ पश्चिम सिमेवरील लमशांग भागातील कडंगबंद गावाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी एका छावणीवर गोळीबार केला. या गोळीबारात मृत्यू झालेले दोघेही कडंगबंद गावाचे स्वयंसेवक होते. नॉन्गथोम्बम मायकेल (३३) आणि मेस्त्राम खाबा (२३) अशी हल्ल्यात ठार झालेल्या स्वयंसेवकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांच्या या गोळीबाराला छावणीच्या स्वयंसेवकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. परिणामी दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात २ स्वयंसेवकांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले. यानंतर गावातील महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गोळीबारानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हिसांचारानंतर अनेक लोक बेपत्ता झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यापूर्वी शनिवारी २७ जानेवारी रोजी देखील मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये गोळीबार झाला होता.यामध्ये एक स्वयंसेवक ठार झाला आणि दोन लोक जखमी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top