‘मदर इंडिया`फेम अभिनेता साजिद खान यांचे निधन

तिरुअंनतपुरम –
गाजलेल्या ‘मदर इंडियाया चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करणारे अभिनेता साजिद खान यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. 22 डिसेंबर रोजी उपचारदरम्यान अखेरचा निरोप घेतला, अशी माहिती साजिद यांचा मुलगा समीर यांनी दिली. साजिद खान त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह केरळमध्ये वास्तव्यास होते. मुंबईत साजिद यांचे बालपण गरिबीत गेले, त्यानंतर चित्रपट निर्माते मेहबूब खान यांनी त्याची प्रतिभा ओळखून त्याला काम दिले. त्यांना सर्वप्रथम 1957 मध्ये आलेल्या मदर इंडिया चित्रपटामध्ये काम मिळाले. या चित्रपटात ते सुनील दत्त यांच्या लहानपणीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटासाठी त्याला 750 रुपये मानधन मिळाले. त्यानंतर साजिद खान यांनी इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. साजिद खान यांनी ‘माया आणि ‘द सिंगिंग फिलिपिना`सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधूनही आपली छाप पाडली. साजिद यांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पीतांबर यांनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यांचे संगोपन चित्रपट निर्माते मेहबूब खान यांनी केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top