मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बोट बुडाली ! ५८ प्रवाशांचा

नवी दिल्ली
मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील मापोके नदी ओलांडताना बोट बुडून ५८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून गेल्या २ दिवसांपासून प्रवाशांचे मृतदेह नदीतून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ३०० जण २० मीटर लांब आणि २ मीटर रुंद बोटीवरुन निघाले होते. या बोटमध्ये काही लोक उभे होते. तर काही बोटमधील लाकडाच्या सीटवर बसलेले होते. बोटीत जास्त प्रवासी बसल्याने ही बोट बुडाली. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ४० मिनिटांनी स्थानिक मच्छिमार मदतीसाठी पोहोचले. या घटनेत काही जणांना वाचवण्यात यश आले. तर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आतापर्यंत ५८ जणांचे मृतदेह नदीतून काढले आहेत, अशी माहिती नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख थॉमस डिजिमासे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top