महादेव अ‍ॅपचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद

दुबई- महादेव बेटिंग अ‍ॅपचा मुख्य सुत्रधार सौरभ चंद्राकर याला संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) अधिकाऱ्यांनी दुबईत नजरकैदे केले आहे. ईडीच्या विनंतीनंतर जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटिसीनंतर दुबईतील अधिकाऱ्यांनी कारवाई ही केली आहे. चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात पोलिसंनी चंद्राकरवर गुन्हा दाखल करत कारवाई केली होती.
चंद्राकर हा महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील दोन मुख्य मालकांपैकी एक आहे. या प्रकरणाचा संबंध मनी लॉन्ड्रींगशी असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. चंद्राकर याला सध्या दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. यूएईचे अधिकारी सध्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. लवकरच पुढची कारवाई सुरू होणार आहे. चंद्राकर देश सोडून पळून जाईल, असा संशय पोलिसांना होता. त्यानंतर चंद्राकरला नजरकैदेत ठेवण्यात आले. चंद्राकर दुबईत असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्यावर कारवाई करू शकत नव्हत्या. चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारताने यूएईसोबत प्रत्यार्पण करार केला आहे, ज्यामुळे चंद्राकरला भारतात आणणे सोपे होणार आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणाच्या आधारे देशाच्या केंद्रीय यंत्रणांनी महादेव अॅपचा प्रमुख सौरभ चंद्राकर याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे महादेव अॅपचे प्रमुख आहेत. हे दोघे युएईमधील त्यांच्या कार्यालयातून महादेव बेटिंग अ‍ॅप ऑपरेट करत होते. या प्रकरणात किमान ६००० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे. उप्पलला डिसेंबरच्या सुरुवातीला दुबईत स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. उप्पलला भारतात आणण्यासाठी अधिकारी यूएईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यावेळी तपास यंत्रणेने सांगितले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top