मुंबईतच्या डॉकयार्ड भागात २४ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई

मुंबईतील ए, बी आणि ई विभागातील काही भागांत उद्या सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करून या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम उद्या हाती घेतले जाणार आहे.डॉकयार्ड रोड झोन, हातीबाग मार्ग, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, रे रोड झोन, माऊंट मार्ग, डोंगरी ‘ए’ झोन, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, मध्य रेल्वे यार्ड, वाडी बंदर, आझाद मैदान बुस्टींग या भागांत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नेव्हल डॉकयार्ड सप्लाय, नेसबीट झोन, म्हातारपाखाडी रोड झोन, बाबूला टँक झोन, डोंगरी बी झोन या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top