मुंबईतील नऊ रस्त्यांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत बदल

मुंबई :

मुंबईतील ९ महत्त्वाच्या रस्त्यांवरील वेग मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला आहे. नव्या वेगमर्यादेचा नियम आजपासून लागू झाले आहेत.

वाढते वाहन अपघात रोखण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाने महत्त्वाच्या ९ रस्त्यांवरील वेगमर्यादेत बदल केले आहेत. यात पी डी मेलो रोड, गोदरेज जंक्शन आणि ओपेरा हाऊस कर्वे रोड आणि हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशन दरम्यान केशवराव खाडे मार्गावर कमाल वेगमर्यादा ५० किमी प्रतितास इतकी असणार आहे.बिंदु माधव चौक ते लव्ह ग्रोव्ह जंक्शन दरम्यान खान अब्दुल गफार खान रोड, डायमंड जंक्शन आणि एमटीएनल जंक्शन बीकेसी या मार्गावर ६० किमीपर्यंत वेगमर्यादा असेल, तर चेंबूरचा जिजामाता फ्लायओव्हरवरही ६० किमी प्रतितास वेगमर्यादा असून फ्लायओव्हरवर चढताना आणि उतरताना ती ४० किमी प्रतितास इतकी असणार आहे.

छेडानगरच्या न्यू नॉर्थ साउथ फ्लायओव्हरवर ४० किमी प्रतितास वेगमर्यादा असणार आहे. तर जेव्हीएलआर फ्लायओव्हरवर ७० किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा असणार आहे. मात्र फ्लायओव्हरवर चढताना आणि उतरताना ती ३० किमी प्रतितास इतकी असेल. चेंबूरच्या अमर फ्लायओव्हरवरही वेगमर्यादा ७० किमी प्रतितास असेल पण सुरुवातीला आणि शेवटी ४० किमी प्रतितास वेग मर्यादा असणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनधारक आणि चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top