मुंबईतील नाले बंदिस्त होणार १० फूट उंच जाळी लावणार

मुंबई-मुंबईतील महत्त्वाचे नाले मजबूत प्लॅस्टिक आवरणे आणि लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केले जाणार आहेत.नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात वांद्रे-पूर्वसह इतर काही ठिकाणी करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मुंबईभरात हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पावसाळयात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी व्यापक प्रमाणात नालेसफाई करण्यात येते. मात्र मार्चपासून नालेसफाई झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात या नाल्यामध्ये गाळ साचतो. यामध्ये रहिवाशांकडून नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे नालेसफाई झाल्यानंतरही नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी नाल्यात कचरा टाकताना आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड करण्या हा प्रयोग यशस्वी झाला असून अन्य ठिकाणीही नाल्याशेजारी अशाच जाळ्या बसवण्याचा ,तसेच नाल्याशेजारी कचरा फेकणार्‍यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top