यूजीसी नेट परीक्षा ६ डिसेंबरपासूननवी

दिल्ली –

सहायक प्राध्यापक, ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी अनिर्वाय असलेल्या यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
६ डिसेंबरला पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परदेशी भाषांची परीक्षा असेल, तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील. ७ डिसेंबरला पहिल्या सत्रात वाणिज्य विषयाची परीक्षा पार पडेल, तर अन्य विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात होतील. राज्यशास्त्राची परीक्षा ११ डिसेंबरला पहिल्‍या सत्रात होईल. १२, १३ आणि १४ डिसेंबरलाही दोन्ही सत्रात परीक्षा होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top